तमिळनाडूच्या राजकारणात दिनकरन यांचा नवा पक्ष

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

''आगामी सर्व निवडणुका नव्या पक्षाचे नाव आणि पक्षाच्या झेंड्यासह आम्ही जिंकणार आहोत. आम्ही 'दोन पाने' असलेले चिन्हाची मागणी केली. मात्र, ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. तोपर्यंत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह म्हणून आम्ही 'प्रेशर कुकर'चा वापर करणार आहोत'.

-  टीटीव्ही दिनकरन, सर्वेसर्वा, अम्मा मक्कल मुनेत्र कझगम

नवी दिल्ली : तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे निधन झाल्यानंतर पक्षांतर्गत कलह निर्माण झाला. या कलहानंतर पक्षाचे बंडखोर नेते टीटीव्ही दिनकरन यांनी 'अम्मा मक्कल मुनेत्र कझगम' या नव्या पक्षाची स्थापना केली. याबाबतची घोषणा दिनकरन यांनी आज (गुरुवार) केली.  

जयललिता यांच्या निधनानंतर आर. के. नगर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत अपक्ष असलेले दिनकरन यांनी विजय मिळवला. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून दिनकरन नव्या पक्षाची स्थापना करणार याबाबत सांगितले जात होते. त्यानंतर आज त्यांनी नवा पक्ष स्थापन केला असून, त्यांना 'दोन पान' हे पक्षाचे चिन्ह हवे होते. मात्र, त्यांना ते चिन्ह अद्याप मिळाले नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या पक्षाचे चिन्ह 'प्रेशर कुकर' हे असणार आहे. तसेच आगामी निवडणुकांमध्ये दिनकरन हे जयललिता यांचे छायाचित्र असलेले झेंडे घेऊन प्रचारात उतरणार आहेत. 

dinakaran new party

''आगामी सर्व निवडणुका नव्या पक्षाचे नाव आणि पक्षाच्या झेंड्यासह आम्ही जिंकणार आहोत. आम्ही 'दोन पाने' असलेले चिन्हाची मागणी केली. मात्र, ती मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. तोपर्यंत निवडणुकीत पक्षाचे चिन्ह म्हणून आम्ही 'प्रेशर कुकर'चा वापर करणार आहोत'', असे दिनकरन यांनी सांगितले.

दरम्यान, दिनकरन यांनी नवा पक्ष स्थापन केल्याने तमिळनाडूच्या राजकारणात आणखी एका नव्या पक्षाची भर पडली आहे. 

Web Title: Marathi News National News Political News TTV Dinakaran Formed New Party