लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता जाणार : मायावती

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) हिंदुत्वाचा अजेंडा देशभर पसरविला जात आहे. देशातील सध्याची परिस्थिती 1975 सालच्या आणीबाणीपेक्षाही बिकट बनली आहे.

- मायावती, सर्वेसर्वा ,बसप 

चंदीगड : 2019 च्या आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असून, केंद्रात असलेली भाजपची सत्ता जाईल, असा विश्वास उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (शुक्रवार) व्यक्त केला. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाला असून, या दोन्ही जागांवर समाजवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

BSP

बसपचे संस्थापक दिवंगत कांशी राम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रॅलीला मायावती संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी बसप कार्यकर्त्यांना दिले. या रॅलीला चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. मायावती म्हणाल्या, ''काँग्रेस आणि भाजपकडून दलित जनतेसाठी विकासकामे केली गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, खरी परिस्थिती वेगळीच आहे. तसेच केंद्राकडून नोकऱ्यांमध्ये मिळणारे आरक्षण कमी करून खासगीकरण करण्याचा प्रयत्न केला जात आहे''. 

Image result for BJP

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (आरएसएस) हिंदुत्वाचा अजेंडा देशभर पसरविला जात आहे. देशातील सध्याची परिस्थिती 1975 सालच्या आणीबाणीपेक्षाही बिकट बनली आहे, असेही मायावती म्हणाल्या.  

  

Web Title: Marathi News National News Political News Upcoming Election 2019 BSP Mayawati