भाजपला अतिआत्मविश्वास नडला : योगी आदित्यनाथ

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

पोटनिवडणुकांच्या या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ''भाजपला अतिआत्मविश्वास नडला'', असे वक्तव्य करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

लखनौ : उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील गोरखपूर व फुलपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने भाजपच्या उमेदवारांना मोठ्या फरकाने मागे टाकत या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकांच्या या निकालानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ''भाजपला अतिआत्मविश्वास नडला'', असे वक्तव्य करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. 

Samajwadi party

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदी तर केशव प्रसाद मौर्य उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर या दोघांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे गोरखपूर आणि फुलपूर या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजप आणि समाजवादी पक्षाने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, मतमोजणीअंती गोरखपूर आणि फुलपूर या पोटनिवडणुकीत भाजपचा दारूण पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फुलपूरमधून सपा उमेदवार नागेंद्र सिंह पटेल ५९ हजार ६१३ मतांनी विजयी झाले आहेत. 

 

Web Title: Marathi News National News Political News Uttar Pradesh Bypoll Yogi Adityanath