'भाजप, संघ नाही, तर आम्ही उभारणार राम मंदिर'

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

''आतापर्यंत त्यांच्याकडून राम मंदिरचा मुद्दा उपस्थित केला जात असे. त्यामुळे जेव्हा राम मंदिरची उभारणी केली जाईल, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसणार आहे. त्यानंतर ते चमच्या घेऊन ताट वाजवतील''.  

- तेजप्रताप यादव, माजी आरोग्यमंत्री, बिहार

नवी दिल्ली : सतत काहीतरी वक्तव्य करून चर्चेत राहणारे राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री तेजप्रताप यादव यांनी आयोध्येतील राम मंदिराबाबत एक वक्तव्य केले. ते म्हणाले, ''भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) नाहीतर राजद सत्तेवर आल्यावर उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर उभारण्यात येईल''.

Ram Mandir

बिहारच्या नालंदा येथील आयोजित एका कार्यक्रमात तेजप्रताप बोलत होते. ते म्हणाले, ''हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांच्यासह अति मागास, गरिब आणि दलित हे सर्वजण आयोध्येत जातील आणि एक-एक विट ठेऊन राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करतील. त्यानंतर तिथे पुजा करतील. राम मंदिर उभारणीसाठी आम्ही काम करणार आहोत. आयोध्यामध्ये जेव्हा राम मंदिर उभारले जाईल. तेव्हा भाजप आणि आरएसएस संपुष्टात येईल''. 

तसेच भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, ''आतापर्यंत त्यांच्याकडून राम मंदिरचा मुद्दा उपस्थित केला जात असे. त्यामुळे जेव्हा राम मंदिरची उभारणी केली जाईल, तेव्हा त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नसणार आहे. त्यानंतर ते चमच्या घेऊन ताट वाजवतील''.  

Web Title: Marathi News National News Political News We Will Build Ram Mandir Says Tejpratap Yadav RJD