मध्यप्रदेश पोटनिवडणूक ; मुंगावली आणि कोलारसमध्ये काँग्रेस आघाडीवर

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

मुंगावली विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार महेंद्र सिंग आणि कोलारस मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे आमदार राम सिंग यादव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणुक घेण्यात आली. या दोन्ही जागा गुना लोकसभा मतदारसंघात येत असून, खासदार ज्योतिरादित्य सिंदिया हे प्रतिनिधित्व करत आहेत. 

नवी दिल्ली : मध्यप्रदेश राज्यातील मुंगावली आणि कोलारस विधानसभा पोटनिवडणूक काही दिवसांपूर्वी झाली. या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरवात झाली. मुंगावली आणि कोलारस या दोन्ही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली असून, भाजप पिछाडीवर आहे.

मुंगावली विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार महेंद्र सिंग आणि कोलारस मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे आमदार राम सिंग यादव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणुक घेण्यात आली. या दोन्ही जागा गुना लोकसभा मतदारसंघात येत असून, खासदार ज्योतिरादित्य सिंदिया हे प्रतिनिधित्व करत आहेत. 

voting india

काँग्रेसचे उमेदवार ब्रिजेंद्र सिंग यादव आणि भाजप उमेदवार बाईशहिद यांच्यासह इतर 13 उमेदवारांमध्ये ही लढत होत आहे. मात्र, मुंगावली येथे काँग्रेसचे यादव आणि भाजपचे बाईशहिद यांच्या मुख्य लढत होत आहे. तर कोलारस येथे भाजपचे उमेदवार देवेंद्र जैन आणि काँग्रेसचे उमेदवार महेंद्र सिंग यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी 22 उमेदवार रिंगणात असून, दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे. 

या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाल्यास खासदार सिंदिया यांच्या नावाचा विचार मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची मानली जात आहे.  

दरम्यान, मुंगावली विधानसभा पोटनिवडणुकीत 77.05 मतदान झाले तर कोलारस येथे 70.4 टक्के इतके मतदान झाले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. या मतदानादरम्यान काही ठिकाणी किरकोळ मारहणीच्या घटना घडल्या. 24 फेब्रुवारी रोजी या विधानसभा पोटनिवडणूक घेण्यात आली होती. आता याची मतमोजणी सुरु आहे.  

Web Title: Marathi News National News Politics Congress leading over BJP in Mungaoli and Kolaras