तामिळनाडू विधानसभेतील जयललितांच्या तैलचित्रास द्रमुकचा विरोध

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

विधानसभेचे सभापती पी. धनपल यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मात्र, याविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालात धाव घेतली.

चेन्नई : अण्णा द्रमुक पक्षाच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या सात फुटांच्या तैलचित्राचे अनावरण आज (सोमवार) तामिळनाडू विधानसभेत करण्यात आले. विधानसभेचे सभापती पी. धनपल यांच्या हस्ते या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. मात्र, याविरोधात द्रमुकने मद्रास उच्च न्यायालात धाव घेतली.

jayalalitha portrait

अण्णा द्रमुकची सत्ता असलेल्या तामिळनाडूमध्ये सत्ताधारी आमदारांनी जयललिता यांच्या तैलचित्र विधानसभेत लावले. या तैलचित्राचे अनावरण सभापतींच्या हस्ते करण्यात आले. मात्र, दिवंगत जयललिता या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सर्वोच्च न्यायालयात दोषी ठरल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या तैलचित्रास द्रमुकने विरोध केला. तसेच द्रमुकने याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याबाबतची याचिका मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी आणि न्यायाधीश अब्दुल कद्दसी यांच्यासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास दाखल करण्यात आली. द्रमुकचे ज्येष्ठ वकिल पी. विल्सन यांनी न्यायालयाला विनंती केली, की न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर त्वरित निर्णय घ्यावा. 

दरम्यान, द्रमुकने विधानसभेतील तैलचित्राबाबत मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालय यावर काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Marathi News National news Politics Jaylalita Portrait DMK oppose them tamilnadu