कार्ती चिदंबरम यांची अटक ही मोदी सरकारचे विकृत राजकारण ; काँग्रेसची टीका

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

प्रियंका चतुर्वेदी यांनी या अटकेवरून केंद्र सरकारवर टीका केली. कार्ती चिदंबरम यांची अटक एक विकृत राजकारणाचे लक्षण आहे. याच्या माध्यमातून मोदी सरकारने भ्रष्ट शासन मॉडेल लपविण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, द्वारका दास सेठ ज्वेलर्स यांसारखे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

नवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवाऱ) सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईतून अटक केली. त्यानंतर काँग्रेसने या अटकेवरुन भाजपवर शरसंधान साधले. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कार्ती चिंदबरम यांची अटक हे मोदी सरकारचे विकृत राजकारण असल्याचे म्हटले आहे.

karti

कार्ती चिदंबरम आज सकाळी लंडनहून चेन्नई परतताच त्यांना सीबीआयने विमानतळाहून अटक केली. कार्ती चिदंबरम यांचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. भास्कररमण यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता कार्ती यांना विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. 

प्रियंका चतुर्वेदी यांनी या अटकेवरून केंद्र सरकारवर टीका केली. कार्ती चिदंबरम यांची अटक एक विकृत राजकारणाचे लक्षण आहे. याच्या माध्यमातून मोदी सरकारने भ्रष्ट शासन मॉडेल लपविण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, द्वारका दास सेठ ज्वेलर्स यांसारखे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Web Title: Marathi News National News Politics Karti arrest is diversionary tactic says Congress