आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी मीसा भारतींविरोधात समन्स जारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने 23 डिसेंबर रोजी भारती आणि त्यांचे पती शैलेश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कन्या खासदार मीसा भारतींविरोधात आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाकडून समन्स जारी करण्यात आले आहे.  

न्यायालायने मिशैली पॅकर्स आणि प्रिंटर्सलाही समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाने यातील सर्व आरोपींना 5 मार्चपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत विशेष न्यायाधीश एन. के. मल्होत्रा यांनी सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्रांची दखल घेत समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने 23 डिसेंबर रोजी भारती आणि त्यांचे पती शैलेश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. 

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेश कुमार यांच्याविरोधात दुसरे आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर आता भारती यांना समन्स बजावण्यात आले आहे.

Web Title: Marathi News National News Politics lalu prasad daughter Misa Bharati