राजस्थानात भाजपला मिळाला 'तिहेरी तलाक' : शत्रुघ्न सिन्हा

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

राजस्थानात लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पराभव केला. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने यावर लक्ष देऊन काम केले पाहिजे. अन्यथा भाजपला जनता 'टाटा बाय बाय' करेल.

नवी दिल्ली : ''राजस्थानात सत्ताधारी पक्षाला तिहेरी तलाक देण्यात आला. 'अजमेर : तलाक, अल्वर : तलाक, मंगलगड : तलाक' अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला घरचा आहेर दिला. ''आमच्या विरोधकांनी रेकॉर्डब्रेक कामगिरी करत आमच्या पक्षाला जोरदार झटका दिला'', असेही ते म्हणाले.

BJP

राजस्थानात लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने पराभव केला. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेऊन भाजपने यावर लक्ष देऊन काम केले पाहिजे. अन्यथा भाजपला जनता 'टाटा बाय बाय' करेल. राजस्थानातील मंगलगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विवेक धकड विजयी झाले आहेत. विवेक धकड यांना 12,976 मते मिळाली तर अजमेर आणि अल्वर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आहे. 

भाजपच्या या पराभवाबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी पक्षाला घरचा आहेर देत भाजपला या अशा परिस्थितीवर लक्ष देऊन काम केले पाहिजे, असा सल्ला दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News National News Politics MP Shatrugan Sinha Tripple Talaq BJP