अजानमुळे थांबवले पंतप्रधानांनी भाषण !

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना या परिसरात अजान सुरु असल्याने पंतप्रधानांनी त्या अजानचे पावित्र्य ओळखून त्यांचे भाषण काहीकाळ थांबवले. अजान संपल्यानंतर मात्र त्यांनी आपले भाषण पुन्हा सुरु केले. 

नवी दिल्ली : येथील सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सुरु असताना या परिसरात अजान सुरु असल्याने पंतप्रधानांनी त्या अजानचे पावित्र्य ओळखून त्यांचे भाषण काहीकाळ थांबवले. मात्र, अजान संपल्यानंतर त्यांनी आपले भाषण पुन्हा सुरु केले. 

दिल्ली येथील आयोजित भाजप मुख्यालयात पंतप्रधान बोलत होते. नागालँड आणि त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधानांनी आज (शनिवार) जाहीर सभा घेतली. या परिसरात भाषणादरम्यान अजान सुरु होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांचे भाषण काही काळासाठी थांबवले होते. त्यानंतर सुरु असलेले अजान संपल्याने त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यांच्या या विशेष अशा आदराबद्दल सगळीकडे एकच चर्चा आहे. तसेच टि्वटरवरूनही त्यांच्या आदराचे सन्मान आणि कौतुक केले जात आहे.   

Web Title: Marathi News National News Politics narendra modi stopped their speech Ajaan