उमेदवार विसरा, मोदींच्या नावाने मते द्या : अमित शहा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

''मतदारांनो, उमेदवारांकडे पाहू नका. फक्त कमळ चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे पाहा आणि मते द्या''. 

- अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा पार्श्वभूमीवर राज्यात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तसेच दोन्ही पक्षांकडून प्रचारसभाही घेतल्या जात आहेत. राज्यातील एका प्रचारसभेदरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ''उमेदवार विसरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मते द्या'', असे आवाहन केले.

Vote india

अमित शहा राज्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. दक्षिणा कन्नडा जिल्ह्यातील बंटवाल येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ''तुमचे कर्तव्य विधानसभा निवडणूक जिंकणे हे नाही तर तुमचे कर्तव्य मतदान विभाग जिंकणे आहे. जेव्हा असे अनेक बुथ आपण जिंकू तेव्हा निश्चितपणे ही निवडणूक आपण जिंकू. तसेच ते पुढे म्हणाले, ''मतदारांनो, उमेदवारांकडे पाहू नका. फक्त कमळ चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोकडे पाहा आणि मते द्या''. 

पुढील दोन महिन्यांत कर्नाटक विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. या विधानसभेच्या प्रचारसभेत दोन्ही पक्षांकडून टीका केली जात आहे. या प्रचारसभेदरम्यान शहा यांनी मतदारांशी संवाद साधला.

Amit shah

दरम्यान, कर्नाटकात सुमारे 49 कोटी मतदार असून, या निवडणुकीसाठी 56 हजारांपेक्षा अधिक मतदान केंद्र अस्तित्वात आहेत, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडून मिळाली आहे. तसेच एका मतदान विभागात अंदाजे 1200 मतदार असून, हे सर्व त्या-त्या भागातील लोकसंख्येवर आधारित आहे. 

Web Title: Marathi News National News Politics News Karnataka Election Amit Shah Narendra Modi