केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून उत्तर कोरियाची स्तुती

वृत्तसंस्था
गुरुवार, 4 जानेवारी 2018

अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता उत्तर कोरियाने अणुचाचण्या चालूच ठेवल्या. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातून उत्तर कोरियावर टीका केली जात आहे.

नवी दिल्ली : उत्तर कोरिया अमेरिकेचा दबाव झुगारून शक्तिशाली अणुचाचण्या करत जगभरात दहशत पसरवण्याचे काम करत आहे. मात्र, उत्तर कोरियाच्या या कारवाईची स्तुती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केली. 

उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन यांच्याकडून अणुचाचण्या घेण्यात येत आहेत. या अणुचाचण्यांच्या माध्यमातून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर कोरियाकडून घेण्यात आलेल्या या अणुचाचण्या थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग यांना वेळोवेळी इशारा दिला. मात्र, अमेरिकेच्या कोणत्याही दबावाला बळी न पडता उत्तर कोरियाने अणुचाचण्या चालूच ठेवल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेसह जगभरातून उत्तर कोरियावर टीका केली जात आहे. असे असताना केरळच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर कोरियाची स्तुती केली. ते म्हणाले, ''उत्तर कोरिया अमेरिकाविरोधी अजेंडा राबवत आहे. उत्तर कोरिया बचाव करण्यासाठी अमेरिकेकडून टाकण्यात आलेल्या दबावाला बळी पडत नाही''. 

दरम्यान, किम जोंग उन यांच्याप्रमाणेच माझ्या टेबलावरही नेहमी अण्विक बटण असते. मात्र, ते किम यांच्याकडे असलेल्या बटणापेक्षा अधिक शक्तिशाली आणि मोठे आहे, हे त्यांना त्यांच्याच देशातील कोणीतरी सांगावे. माझ्याकडे असलेले अण्विक बटण कार्यक्षम आहे, असे ट्विट ट्रम्प यांनी केले होते.

Web Title: marathi news national news politics news Kerala CM Pinarayi Vijayan praises North Korea for successfully defending US pressure