2 आमदारांच्या बळावर भाजपला सत्ता स्थापनेचे स्वप्न !

वृत्तसंस्था
रविवार, 4 मार्च 2018

भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. एनपीपी, यूडीपी आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा पार केला जाण्याची शक्यता आहे. हा आकडा 34 वर जाण्याची शक्यता आहे. या राज्यात सरकार स्थापनेसाठी 31 आमदारांची गरज आहे.

नवी दिल्ली : त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्रिपुरामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, नागालँडमध्ये इतर काही पक्षांसोबत युती करून भाजपकडून सरकार स्थापन करण्यात येणार आहे. मात्र, मेघालयमध्ये भाजपला 2 जागांवर विजय मिळाला असला तरीदेखील भाजपकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

त्रिपुरामध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी 43 जागांवर भाजपचा विजय झाला तर नागालँडमध्ये विधानसभेच्या भाजपचा 29 जागांवर विजय झाला. मात्र, मेघालयमध्ये विधानसभेच्या 60 जागांपैकी काँग्रेसने 21 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, या राज्यात भाजपला फक्त 2 जागांवर विजय मिळाला आहे. तरीदेखील येथे भाजपने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. एनपीपी, यूडीपी आणि इतर पक्षांच्या पाठिंब्यावर बहुमताचा आकडा पार केला जाण्याची शक्यता आहे. हा आकडा 34 वर जाण्याची शक्यता आहे. या राज्यात सरकार स्थापनेसाठी 31 आमदारांची गरज आहे. 

दरम्यान, नवनिर्वाचित आमदार ए. एल. हेक यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिज्जू यांनी ट्विटरवरून दिली. त्यामुळे हेक यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली जाण्याची शक्यता आहे. 

Web Title: Marathi News National News Politics News Meghalaya Election BJP will Form Government