नितीशकुमारांनी बंगल्यात भूतं सोडली ; तेजप्रताप यांचा दावा

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

''तेजप्रताप यांनी बंगला रिकामा करण्याचा निर्णय दुसरी नोटीस मिळाल्यानंतर घेतला. सरकारी बंगला सोडला नाही तर त्यांना त्या बंगल्यासाठी 15 पट भाडे द्यावे, असे त्या नोटीशीमध्ये सांगण्यात आले होते''. 

- शक्तिसिंह यादव, प्रवक्ते, राष्ट्रीय जनता दल

पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी यांनी मागील आठवड्यात त्यांचा सरकारी बंगला अखेर रिकामा केला आहे. हा बंगला सोडताना त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या बंगल्यात भूत सोडल्याचा आरोप केला आहे.

नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळात तेजप्रताप यादव हे आरोग्यमंत्रिपदाचे कामकाज पाहत होते. मात्र, नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने राष्ट्रीय जनता दलाशी असलेली आघाडी मोडत भारतीय जनता पक्षाशी युती करून पुन्हा सत्ता स्थापन केली. त्यानंतर तेजप्रताप यादव यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मंत्रिपद गेले तरीदेखील तेजप्रताप यांनी त्यांनी सरकारी बंगला सोडला नाही. त्यानंतर अखेर आज त्यांनी त्यांचा सरकारी बंगला सोडला. 

tejpratap yadav

तेजप्रताप यादव यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ''नीतिशकुमार आणि उपमुख्यमंत्री सुशीलकुमार यांनी माझ्या बंगल्यात भूत सोडले, त्यामुळे मी बंगला रिकामा करण्याचा निर्णय घेतला''. 

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्तिसिंह यादव यांनी सांगितले, की ''तेजप्रताप यांनी बंगला रिकामा करण्याचा निर्णय दुसरी नोटीस मिळाल्यानंतर घेतला. सरकारी बंगला सोडला नाही तर त्यांना त्या बंगल्यासाठी 15 पट भाडे द्यावे, असे त्या नोटीशीमध्ये सांगण्यात आले होते''. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News National News Politics News Tejpratap Yadav Banglow Nitishkumar