काँग्रेसच्या चुकीमुळे सिद्धरामय्या सरकार अलोकप्रिय : पंतप्रधान

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

''कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकार राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करत नाही. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकार असंवेदनशील आहे. केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासकामांसाठी निधी दिला जातो. मात्र, हा निधी राज्याच्या जनतेच्या हितासाठी वापरला जात नाही''

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे भाजप रॅलीदरम्यान कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. ''काँग्रेसच्या चुकीमुळे सिद्धरामय्या सरकार अलोकप्रिय आहे'', असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सोडले.

siddaramaiah

कर्नाटकात प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडीयुरप्पा यांच्या 75 व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी निधी देण्यात आला. मात्र, हा निधी सत्ताधारी सिद्धरामय्या सरकारने राज्याच्या विकासासाठी या निधीचा वापर केला नाही. तसेच राज्यात कोणत्याही आयोगाशिवाय कोणतीही कामे केली गेली नाही''.

तसेच ''कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस सरकार राज्यातील जनतेच्या आरोग्याचा विचार करत नाही. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सरकार असंवेदनशील आहे. केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासकामांसाठी निधी दिला जातो. मात्र, हा निधी राज्याच्या जनतेच्या हितासाठी वापरला जात नाही'', असेही ते म्हणाले.  

Web Title: Marathi News National News Politics PM Modi Criticizes Congress Karnataka Government