...म्हणून पंतप्रधानांनी माफी मागावी ; काँग्रेसची मागणी

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पंतप्रधानांनी केलेली टिप्पणी महिलाविरोधी असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी केली.  

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्यावर टिप्पणी केल्यानंतर काँग्रेसने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधानांनी केलेली टिप्पणी महिलाविरोधी असल्याचे सांगत काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या वक्तव्यावर माफी मागावी, अशी मागणी केली.  

renuka chowdhury MP

'आधार' ओळखपत्रांची कल्पना तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळातच जन्माला आल्याचा उल्लेख मोदींनी करताच रेणुका चौधरी खाली बसूनच अतिशय जोरजोरात हसू लागल्या होत्या. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकून राज्यसभा अध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी त्यांना ''काही प्रॉब्लेम असेल तर डॉक्टरांना दाखवा'', अशी तंबी दिली होती. त्यावर काँग्रेसने नायडूंनाही लक्ष्य करत भेदभाव करू नये, असे सांगितले.

narendra modi

याशिवाय केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी रेणूका यांचा हास्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्या व्हिडिओसोबत रावणची बहिण शूर्पनखाचा फोटोही जोडला. यावर रेणुका यांनी सांगितले, की ''राज्यसभेत विशेषाधिकाराचे हननचा प्रस्ताव मांडणार आहे. तसेच रेणुका यांनी नायडू यांची भेटही घेतली. काँग्रेसकडून मोदींच्या माफीनाम्याची मागणी करण्यात आली. 
 

Web Title: Marathi News National News Politics PM Narendra Modi Congress