हिंदू + मुस्लिम : 'मिशन कर्नाटक'साठी राहुल गांधींचा फॉर्म्युला

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

आता येत्या 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. या निवडणुकांच्या प्रचारसभांदरम्यान हुलीगेम्मा मंदिर, गवी सिद्धेश्वरा मठ आणि ख्वाजा नवाज दरगाह येथे दर्शनासाठी राहुल गांधी जाणार आहेत. यादरम्यान ते मतदारांशी संवाद साधणार आहेत.

नवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपकडून या विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आले. भाजपनंतर आता काँग्रेसकडून प्रचाराला सुरवात करण्यात येणार आहे. यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: प्रचारसाठी मैदानात उतरणार आहेत. येत्या 10 फेब्रुवारीला ते प्रचारसभा घेऊन मंदिर दर्शन करणार आहे.

BJP

कर्नाटकात विधानसभा निवडणुका यावर्ष अखेरपर्यंत घेण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून या राज्यात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेत सत्ताधारी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी काँग्रेस सरकारवर कमिशन घेणारे सरकार असल्याची टीका केली होती. तसेच यावेळी भाजपकडून माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले.  

congress

त्यानंतर आता येत्या 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान राहुल गांधी कर्नाटक दौऱ्यावर असणार आहेत. या निवडणुकांच्या प्रचारसभांदरम्यान हुलीगेम्मा मंदिर, गवी सिद्धेश्वरा मठ आणि ख्वाजा नवाज दरगाह येथे दर्शनासाठी राहुल गांधी जाणार आहेत. यादरम्यान ते मतदारांशी संवाद साधणार आहेत.

Web Title: Marathi News National News Politics Rahul Gandhi Karnataka Assembly Election