राजस्थान लोकसभा पोटनिवडणूक ; अजमेर, अल्वर येथे काँग्रेस आघाडीवर

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

काँग्रेसने अजमेर आणि अल्वर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. तर भाजप मंदलगड येथे आघाडीवर आहे. अल्वर येथे भाजपच्या जसवंत सिंह यादव यांची काँग्रेसच्या करण सिंह यादव यांच्याशी लढत होत आहे. तर अजमेर येथे काँग्रेसचे रघू शर्मा आणि भाजपचे राम स्वरूप लांबा यांच्याशी टक्कर होत आहे.

जयपूर : राजस्थान येथे सोमवारी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. या मतदानाची मतमोजणीला सुरवात झाली आहे. दोन लोकसभा आणि एक विधानसभा मतदारासंघात ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदानाच्या मतमोजणीला सकाळी आठपासून सुरवात झाली असून, अजमेर, अल्वर येथे काँग्रेस आघाडीवर आहे.

rajsthan election

काँग्रेसने अजमेर आणि अल्वर या ठिकाणी पहिल्या टप्प्यात आघाडी घेतली आहे. तर भाजप मंदलगड येथे आघाडीवर आहे. अल्वर येथे भाजपच्या जसवंत सिंह यादव यांची काँग्रेसच्या करण सिंह यादव यांच्याशी लढत होत आहे. तर अजमेर येथे काँग्रेसचे रघू शर्मा आणि भाजपचे राम स्वरूप लांबा यांच्याशी टक्कर होत आहे. यामध्ये मंडलगढमध्ये मुख्यत्वे करून भाजपचे शक्तिसिंह हाडा आणि काँग्रेसचे विवेक ढकज यांचा समावेश आहे. 

दरम्यान, काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सांगितले, की ''मला आशा आहे, या निवडणुकीत काँग्रेस मोठी आघाडी घेईल आणि आमचे उद्दिष्ट अधिकच वाढेल. वसुंधराजी आणि त्यांच्या सरकारला राज्यातील जनतेने पूर्णपणे नाकारले आहे''.

Web Title: Marathi News National News Politics Rajsthan Bypoll Election Congress Leads