सोनिया गांधींकडून विरोधकांसाठी 'डिनर'

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून, येत्या 9 फेब्रुवारीला सोनिया गांधी यांनी या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचेही आयोजन केले आहे.

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी विरोधकांना एकत्र करण्यासाठी जोरदार हालचाली करत आहेत. त्यासाठी सोनिया गांधी यांच्याकडून डिनरचे आयोजन करण्यात येणार आहे. ही बैठक 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 

संसदेच्या अधिवेशनादरम्यान सत्ताधारी भाजपला विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी ही बैठक घेतली जात आहे. आक्रमक रणनीती आखण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केले जात आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस सत्ताधारी भाजपला घेरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

sonia gandhi

यासाठी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोनिया गांधी यांनी नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली असून, येत्या 9 फेब्रुवारीला सोनिया गांधी यांनी या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचेही आयोजन केले आहे.

दरम्यान, काँग्रेसने बोलावलेल्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: Marathi News National News Politics Sonia Gandhi Opposition Dinner Party