'तेलगू देसम' तूर्त एनडीएसोबतच राहणार

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) तूर्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष (टीडीपी) तूर्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. टीडीपीच्या बैठकीनंतर पक्षातील नेते वाय. एस. चौधरी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली. ''भाजपसोबतचे जे काही मतभेद असतील, त्यावर येत्या चार दिवसांत तोडगा काढण्यात येईल'', असे चौधरी म्हणाले. 

chandrababu naidu

2018-19 वर्षासाठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला काहीही न मिळाल्याने चंद्राबाबू संतप्त झाले आहेत. एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेनंतर नायडू यांनी नरेंद्र मोदी-अमित शहा प्रणीत भाजप आघाडीला रामराम करण्याचा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, आज तेलगू देसम संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर टीडीपी एनडीएसोबत राहणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.  

chandrababu naidu-modi-amit

दरम्यान, अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशाच्या विकासासाठी निधी दिला नसल्याने नाराज झालेल्या तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एनडीएमधून बाहेर पडण्याचे संकेत दिल्यानंतर जेटलींनी यावर भाष्य केले. "आम्ही आंध्र प्रदेशसाठी वेगळे पॅकेज लागू करणार आहोत. याचा अर्थसंकल्पाशी काहीही संबंध नाही. तसेच आम्ही आंध्रच्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत'', असे जेटली यांनी सांगितले होते. 

Web Title: Marathi News National News Politics TDP NDA will not exit