पारंपारिक चौकट मोडून सर्वच क्षेत्रात महिला पुढे : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 28 जानेवारी 2018

भारतीय दलात पहिल्या महिला अधिकारी झालेल्या मोहना सिंह, चतुर्वेदी आणि भावना कांत या महिला पायलटसचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या सर्व महिलांनी सुखोई-30 लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पारंपारिक चौकट मोडून असाधारण यश प्राप्त करत आहेत, पुढे जात आहेत. त्यांच्याकडून देशाचा गौरव वाढत आहे. नारी शक्ती नेहमीच देश, समाज आणि कुटुंब एकतेच्या सूत्रात बांधली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

'मन की बात' या कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले, की ''देशात प्राचीन काळापासून महिलांना सन्मान दिला जात आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पारंपारिक चौकट मोडून असाधारण असे यश प्राप्त करत आहेत, पुढे जात आहेत. महिला शक्तीचे उदाहरण देताना त्यांनी भारतीय वंशाची अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव घेतले. 1 फेब्रुवारी रोजी त्यांचा स्मृतीदिन आहे. चावला यांनी त्यांच्या या महान कार्याबद्दल देशातील अनेकांना प्रेरणा दिल्या आहेत.

भारतीय दलात पहिल्या महिला अधिकारी झालेल्या मोहना सिंह, चतुर्वेदी आणि भावना कांत या महिला पायलटसचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या सर्व महिलांनी सुखोई-30 लढाऊ विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 

दरम्यान, पंतप्रधानांनी या कार्यक्रमादरम्यान प्रकाश त्रिपाठी यांचे आभार मानले.

Web Title: Marathi news National news Politics Women Are Moving Forward In All Fields Increasing The Glory Of The Country Says PM Narendra modi