सतत पॉर्न पाहणाऱ्या मुलाचे संतप्त पित्याने तोडले हात

वृत्तसंस्था
मंगळवार, 6 मार्च 2018

खालेद हा त्याच्या स्मार्टफोनवरून रात्री उशिरापर्यंत चित्रपट, पॉर्न व्हिडिओ पाहात असायचा. त्याची ही सवय सोडण्यासाठी त्याचे पिता मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, तो त्याच्या पित्याचे ऐकत नसे. त्यामुळे या दोघांमध्ये अनेकदा वाद होत असे.

हैदराबाद : स्मार्टफोनमध्ये इंटरनेट असल्यास माणूस संपूर्ण जगाशी जोडला जातो. मात्र, त्याच्या फायद्यांबरोबरच याचे काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून काही वाईट गोष्टींची सवयही लागते. अशीच सवय येथील तरुणाला लागली ती म्हणजे पॉर्न व्हिडिओ पाहण्याची. याबाबतची माहिती मिळताच संतप्त पित्याने त्याच्या पोटच्या मुलाचे धारधार सुऱ्याने हात तोडले. हा धक्कादायक प्रकार तेलंगणच्या सायबराबाद येथे घडला.

porn ban

खालेद असे त्या मुलाचे नाव आहे. खालेद हा त्याच्या स्मार्टफोनवरून रात्री उशिरापर्यंत चित्रपट, पॉर्न व्हिडिओ पाहात असायचा. त्याची ही सवय सोडण्यासाठी त्याचे पिता मोहम्मद कुरेशीने त्याला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, तो त्याच्या पित्याचे ऐकत नसे. त्यामुळे या दोघांमध्ये अनेकदा वाद होत असे. दोन दिवसांपूर्वीच पॉर्न क्लिप पाहण्याच्या सवयीवरुन मोहम्मद कुरेशी आणि खालेदचे जोरदार भांडण झाले होते. संतापाच्या भरात खालेदने त्याच्या पित्याला मारहाण केली आणि घराबाहेर निघून गेला. त्यानंतर खालेद घरी परतल्यानंतर रात्री झोपलेला असताना त्याचे वडिल मोहम्मद कुरेशी त्याच्या रुममध्ये गेला. मोहम्मद कुरेशीने धारधार सुऱ्याने खालेदच्या हातावर वार करत त्याचे हात तोडले.
 
याप्रकरणी आरोपी मोहम्मद कय्यूम कुरेशी (43) या पित्यास पहाडीशरीफ पोलिसांनी अटक केली. तसेच जखमी मुलाला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गंभीर घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Web Title: Marathi News National News Porn Video watch Son Father Cut their Hands