प्रत्येक भारतीय मूल जन्मापासूनच राजकारणी : पंतप्रधान 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

''बोर्ड परीक्षेदरम्यान घरामध्ये संचारबंदीसारखे परिस्थिती निर्माण होत असते. अशी परिस्थिती कधीही विद्यार्थ्यांचा निकाल वाढवू शकत नाही. समतोल विकासासाठी आयक्यू आणि ईक्यू या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रत्येक भारतीय मूल जन्मापासूनच राजकारणी असते.''

-  पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ''बोर्ड परीक्षेदरम्यान घरामध्ये संचारबंदीसारखे परिस्थिती निर्माण होत असते. अशी परिस्थिती कधीही विद्यार्थ्यांचा निकाल वाढवू शकत नाही. समतोल विकासासाठी आयक्यू आणि ईक्यू या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत'', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच प्रत्येक भारतीय मूल जन्मापासूनच राजकारणी असते, असेही ते म्हणाले. 

modi

दिल्लीतील तळकोटा स्टेडियम येथे आयोजित 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. दहावी-बारावी बोर्ड परीक्षेसंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे हजारो प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ते म्हणाले, 1.25 कोटी भारतीय जनतेसाठी सामर्थ्य आहे. निवडणुका येतात जातात त्या एका वस्तूसारख्या आहेत. त्यामुळे मला देशातील जनतेसाठी काम करायचे आहे.  

ते पुढे म्हणाले, बऱ्याचदा विद्यार्थी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वतीची पूजा करतात. मात्र, परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांनी हनुमानाची उपासना करावी. मी आज तुमच्याशी पंतप्रधान म्हणून नाही तर एक मित्र म्हणून बोलत आहे. आज तुम्ही माझी परीक्षा घेणार आहात आणि मला गुण देणार आहात. यावेळी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

Web Title: Marathi News National News Prime Minister Pariksha par charcha