मोदी आडनाव भ्रष्टाचाराचे दुसरे नाव : राहुल गांधी

वृत्तसंस्था
रविवार, 18 मार्च 2018

''भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कौरवांप्रमाणे सत्तेसाठी वागत आहेत. संघाला देशातील सर्व संघटना नष्ट करायच्या आहेत. त्यांना फक्त त्यांची एकच संघटना देशात हवी आहे. इतर संस्थांमध्ये ते आपले लोक बसवून त्यांचे अस्तित्व मिटवत आहेत''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेसही गांधीजींचे संघटन असून, वाघांची ही संघटना आहे. आपल्याला अनेक भिंती तोडून पुढे यायचे आहे. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आता देशात भ्रष्टाचाराचे दुसरे नाव मोदी अडनाव झाले आहे. हत्येतील आरोपी पक्षाचा अध्यक्ष आहे. ते देशाचे काय भले करणार. आम्ही शेतीमाल वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले.

काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशाच्या समारोपप्रसंगी राहुल गांधी बोलत होते. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, तरुणाई आज रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. पंतप्रधानांनी निवडणुकांपूर्वी दिलेले रोजगाराचे आश्वासन पूर्ण केले नाही. त्यामुळे तरुणांचा मोदींवरील विश्वास उडाला आहे. तसेच ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशात एकच संघटना आहे ती म्हणजे काँग्रेस. काँग्रेसच तरूणांना रोजगाराची संधी देईल. यासाठी पक्ष संघटनेत बदल करणे गरजेचे आहे. देशाला बदलण्याची शक्ती कार्यकर्त्यांमध्ये आहे. मात्र, कार्यकर्ते आणि आमच्या नेत्यांमध्ये भिंत आहे. ती भिंत तोडण्याचे काम आम्ही प्रेमाने, आदराने करणार आहोत. 

राहुल गांधी म्हणाले, की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कौरवांप्रमाणे सत्तेसाठी वागत आहेत. संघाला देशातील सर्व संघटना नष्ट करायच्या आहेत. त्यांना फक्त त्यांची एकच संघटना देशात हवी आहे. इतर संस्थांमध्ये ते आपले लोक बसवून त्यांचे अस्तित्व मिटवत आहेत. आम्हाला देशात निर्माण झालेल्या अनेक भिंती तोडायच्या आहेत. युवा आणि राजकारण्यांमधली तोडायच्या आहेत. काँग्रेस हा देशाचा आवाज आहे. काँग्रेसने कधीच द्वेषाचे राजकारण केले नाही. भ्रष्टाचार आणि बरोजगारीचा प्रश्न सोडवायची आहे. अमेरिका आणि चीनप्रमाणे आपल्या देशाची व्हिजन असले पाहिजे. 2019 मध्ये काँग्रेस आपली ताकद पुन्हा दाखवेल. नोटाबंदी, जीएसटी यामुळे देशाचे खूप नुकसान झाले आहे.

सध्या देश अडचणीत आहे. देशातील कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत. त्यांना आता समजत नाही, काय करायचे. तरुणांनी चार वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवला होता. मात्र, त्यांचा हा विश्वास आता तुटला पूर्णपणे तुटला आहे. रोजगाराचा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार तरुणाई करत आहे.

यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, एका हत्येतील आरोपीला भाजपने पक्षाचे अध्यक्ष बनवले आहे. भाजप आणि संघ कौरवाप्रमाणे सत्तेसाठी लढत आहे. सध्या भाजपला सत्तेची नशा चढली आहे. मात्र, काँग्रेस हा देशाचा आवाज आहे. भाजप हा केवळ संघटनेचा आवाज पण काँग्रेस हा देशाचा आवाज आहे. देशवासियांना काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. पंतप्रधान मोदींनी जनतेला 15 लाखांचे दिलेले आश्वासन का पाळले नाही. त्यानंतर त्यांनी यावर कोणतेही भाष्यही केले नाही. हा मुद्दा दुसरीकडे नेण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. रोजगार, शेतकरी आत्महत्यांवर पंतप्रधानांनी बोलणे गरजेचे आहे. पण ते यावर काहीच न बोलता शांत आहेत. 

 

Web Title: Marathi News National News Rahul Gandhi Criticizes PM Narendra Modi