राहुल गांधींचा विमान प्रवासातील फोटो व्हायरल

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

नवी दिल्ली  - मेघालय दौऱ्यावर असलेले राहुल गांधी सध्या त्यांच्या 70 हजारांच्या जॅकेटमुळे चर्चेत आहेत. आता त्याच्या विमान प्रवासादरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे. राहुल गांधींनी या प्रवासादरम्यान विमानातील काही प्रवाशांना सामान व्यवस्थित ठेवण्यात मदत केली त्यांचा हा फोटो एका सहप्रवाशांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, तो सध्या व्हायरल होत आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दिल्लीहून विमानाने गुवाहटीला जात होते. यावेळी त्यांनी सीटवर बसलेल्या सहप्रवाशांना त्यांच्या बॅगस ओव्हरहेड केबिनमध्ये ठेवण्यास मदत केली. इतकेच नाही तर इतर प्रवाशांचे सामान ठेवण्यासाठी त्यांनी जागा करून दिली. एका मोठ्या नेत्याचे हे वागणे पाहून इतर प्रवासीही आश्चर्यचकीत झाले. त्याचे हे फोटो त्याच्याबरोबर असलेल्या एका सहप्रवाशाने ट्विट केले आहेत. 

Web Title: marathi news national news rahul gandhi photos