मोदीजी, तुम्ही पंतप्रधान आहात! विसरू नका : राहुल गांधी

वृत्तसंस्था
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

''मी समजू शकतो, की मागील 70 वर्षाबाबत आपण काय बोलत आहात. मात्र, आज देशात भाजपची सत्ता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार देशात सत्तेवर आहे. तरीदेखील मोदीजी देशाचे पंतप्रधान असल्याचे विसरत आहेत. ते विरोधी पक्षांचे नेते नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे''. 

- राहूल गांधी, काँँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : ''नरेंद्र मोदी हे आता विरोधी पक्षांचे नेते नसून, पंतप्रधान आहेत, असे मोदींनी विसरता कामा नये'', असे प्रत्युत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले. 

narendra modi

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, ''काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विरोधी पक्ष फक्त नावाला होते. तत्कालीन मीडियाही सरकारच्या म्हणण्यानुसार वागत होती. काँग्रेसला कोणीही विरोध करत नव्हते. पंचायतपासून ते संसदेत काँग्रेसचाच आवाज होता. रेडिओही काँग्रेसचे होते'', अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले होते.  

rahul gandhi

त्यानंतर त्यांच्या या टीकेला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले. राहुल गांधी म्हणाले, ''मी समजू शकतो, की मागील 70 वर्षाबाबत आपण काय बोलत आहात. मात्र, आज देशात भाजपची सत्ता आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार देशात सत्तेवर आहे. तरीदेखील मोदीजी देशाचे पंतप्रधान असल्याचे विसरत आहेत. ते विरोधी पक्षांचे नेते नाहीत, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे''. 

Web Title: Marathi News National News Rahul Gandhi Reply To PM Narendra Modi