'तेजस', 'शताब्दी'मध्ये करण्यात आले 'हे' बदल

वृत्तसंस्था
बुधवार, 14 मार्च 2018

सध्या फक्त प्रिमियम रेल्वेमध्ये मोफत वाय-फायची सेवा दिली जात आहे. मात्र, आता यापुढे सर्वच रेल्वे गाड्यामध्ये ही सेवा देण्याबाबत विचार केला जात आहे.   

नवी दिल्ली : तेजस आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. या एक्सप्रेसमध्ये प्रवासादरम्यान मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रीनस् देण्यात आले. या एलसीडीच्या माध्यमातून चित्रपट किंवा गेम्स खेळता येत असे. मात्र, या एलसीडी स्क्रीनची मोडतोड करण्यात आल्याने या रेल्वेमधील सर्वच एलसीडी स्क्रीनस् काढून टाका, असे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार एलसीडी स्क्रीन काढण्यात येत आहेत. 

Image result for Tejas Express

सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस भारतात आणल्यानंतर विविध आवश्यक सेवा-सुविधा दिल्या गेल्या. तेजस आणि मुंबई-अहमदाबाद यामार्गे धावणारी शताब्दी एक्सप्रेसच्या प्रत्येक सीटच्या मागे एक एलसीडी स्क्रीनस् देण्यात आले होते. या एलसीडी स्क्रीनवरून चित्रपट, गेम्स खेळता येत होते. मात्र, काही महिन्यातच प्रवाशांनी या एलसीडी स्क्रीनची मोडतोड केली. या एलसीडीच्या वायर्स तुटलेल्या अवस्थेत होत्या. तसेच हेडफोन्सही चोरीला गेले होते. याप्रकाराची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असून, सर्व एलसीडी स्क्रीन काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत.  

Image result for Tejas Express

''तेजस आणि शताब्दी एक्सप्रेसमध्ये असलेले एलसीडी स्क्रीन काढण्याबाबत फेब्रुवारी महिन्यात आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर सर्व विभागीय रेल्वे प्रशासनाने एलसीडी काढून टाकण्याची कार्यवाही सुरु केली. एलसीडी जरी काढण्यात येत असले तरी सर्वच रेल्वेमध्ये मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जात आहे'', अशी माहिती रेल्वे बोर्डाचे माहिती आणि प्रसारण संचालक वेद प्रकाश यांनी दिली.  

दरम्यान, सध्या फक्त प्रिमियम रेल्वेमध्ये मोफत वाय-फायची सेवा दिली जात आहे. मात्र, आता यापुढे सर्वच रेल्वे गाड्यामध्ये ही सेवा देण्याबाबत विचार केला जात आहे.   
 

Web Title: Marathi News National News Rail News Tejas Shatabdi Express LCD is Removing