राजस्थानात महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी सलवार-कमीज सक्तीचा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 मार्च 2018

शिक्षण संचालनालयाकडून 219 सरकारी महाविद्यालयांमध्ये याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गणवेश अनिवार्य करण्यात येणार आहे. हा नवा गणवेश पुढील शैक्षणिक वर्षापासून बंधनकारक करण्यात येणार आहे.

जयपूर : राजस्थानातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी शिक्षण संचालनालयाकडून नवा ड्रेसकोड लागू केला जाणार आहे. यासाठी मार्गदर्शक तत्वे शिक्षण संचालनालयाकडून जारी करण्यात आली आहेत. त्यानुसार महाविद्यालयीन तरूणींना सलवार, कमीज सक्तीचा केला जाणार आहे.

शिक्षण संचालनालयाकडून 219 सरकारी महाविद्यालयांमध्ये याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी गणवेश अनिवार्य करण्यात येणार आहे. हा नवा गणवेश पुढील शैक्षणिक वर्षापासून बंधनकारक करण्यात येणार आहे. या परिपत्रकानुसार विद्यार्थ्यांनी फक्त शर्ट आणि पँट परिधान करायला हवा. तर विद्यार्थिनींनी सलवार आणि कमीज किंवा साडी आणि ब्लाऊज परिधान करायला हवे, असे त्या परिपत्रकात सांगितले आहे. 

राजस्थानातील सरकारी महाविद्यालयांमध्ये एकूण 4 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये 1 लाख 75 हजार विद्यार्थिनी आहेत.  

uniforms for boys

दरम्यान, 'द पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टिज'ने महाविद्यालय प्रशासनाने काढलेले हे परिपत्रक घटनाविरोधी, प्रतिगामी, पुरुषवर्चस्वावदी आणि हुकूमशाहीवृत्ती दर्शविणारी आहे. विद्यार्थ्यांना जे गणवेश परिधान करायचे याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. विद्यार्थिनी सध्या जीन्स, टी-शर्ट, घागरा परिधान करून महाविद्यालयात येत असतात. त्यांना आवडीचा ड्रेस परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे'', असे 'पीयूसीएल'च्या सरचिटणीस कविता श्रीवास्तव यांनी सांगितले. 

Web Title: Marathi News National News Rajasthan News College Students Dresscode