मदरशांमध्ये दहशतवादी घडवले जातात : शिया वक्फ बोर्ड

वृत्तसंस्था
बुधवार, 10 जानेवारी 2018

''मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आयएसएस अधिकारी, डॉक्टर किंवा इंजिनिअर बनत नाहीत. तर मदरशांमध्ये दहशतवादी घडविले जातात. त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते''

- वसीम रिझवी, अध्यक्ष , उत्तर प्रदेश सेंट्रल वक्फ बोर्ड

लखनौ : अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात प्रस्ताव सादर केल्यानंतर शिया वक्फ बोर्ड चर्चेत आले. त्यानंतर आता शिया वक्फ बोर्डाकडून मदरशांतील शाळेमध्ये शिक्षण देणाऱ्यांबाबत वक्तव्य करण्यात आले. ''मदरशांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी आयएसएस अधिकारी, डॉक्टर किंवा इंजिनिअर बनत नाहीत. तर मदरशांमध्ये दहशतवादी घडविले जातात. त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते'', असे वक्तव्य उत्तर प्रदेश सेंट्रल वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केले.

तसेच रिझवी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून मदरशांना सीबीएसई, राज्य शिक्षण मंडळांना संलग्न केले जावे, अशी मागणी केली आहे. तसेच मदरशांमध्ये दहशतवादी घडविले जातात. त्यांना बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय मदरशांना आधुनिक शिक्षणाचे केंद्र बनवले पाहिजे. मदरशात केवळ मुस्लिमच नाहीतर इतर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायला हवे, अशाप्रकारे मदरशांना आधुनिक बनवायला हवे, असेही ते म्हणाले.  

Web Title: marathi news national news Up Shiya Central Waqf Board President Waseem Rizvi Comment On Madarsas Education