9 गोळ्या लागूनही चित्ता पुन्हा लष्करात

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

मागील वर्षी 14 फेब्रुवारीला काश्मीर भागात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कमांडर चेतन कुमार चित्ता जखमी झाले. या चकमकीत चित्ता यांना 9 गोळ्या लागल्या. त्यानंतर आता एका वर्षानंतर चित्ता पुन्हा लष्करी सेवेत दाखल झाले आहेत.

जम्मू : मागील वर्षी 14 फेब्रुवारीला काश्मीर भागात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) कमांडर चेतन कुमार चित्ता जखमी झाले. या चकमकीत चित्ता यांना 9 गोळ्या लागल्या. त्यानंतर आता एका वर्षानंतर चित्ता पुन्हा लष्करी सेवेत दाखल झाले आहेत.

Chetan Cheetah

लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत चित्ता यांना तब्बल 9 गोळ्या लागल्या होत्या. त्यामुळे जखमी झालेले चित्ता हे गेल्या अनेक महिन्यांपासून सेवेत कार्यरत नव्हते. मात्र, आलेल्या सर्व दुखण्यावर मात करत त्यांनी पुन्हा एकदा लष्करातील सेवेत येण्याचे ठरवले. त्यानुसार मागील आठवड्यापासून ते पुन्हा एकदा सेवेत रूजू झाले आहेत. दिल्लीतील सीआरपीएफच्या मुख्यालयात चित्ता रुजू झाले आहेत.

सेवेत रुजू होताना खाकी वर्दी, उजव्या डोळ्याला पट्टी आणि मेटलचा चष्मा त्यांनी परिधान केला. ''मी सेवेत पुन्हा रूजू होत आहे. याचा मला अभिमान आहे. सेवेत येणे हे माझ्यासाठी चांगले आहे'', असे ते म्हणाले. खाकी वर्दी घालून त्यांनी ही माझी दुसरी त्वचा आहे, असे सांगितले.
 

Web Title: Marathi News National News Shot 9 times by terrorists CRPF commandant Chetan Cheetah