श्रीदेवींच्या पार्थिवावर थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार

वृत्तसंस्था
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवींच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीनच्यादरम्यान अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. श्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेला सुरवात झाली आहे. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये ठेवण्यात आले होते. दुपारी दोन वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवींच्या अकाली निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आपल्या आवडत्या अभिनेत्रीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

सुमारे साडेचार किलोमीटरच्या या प्रवासादरम्यान पोलिस आणि एसआरपीएफने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. काल रात्री म्हणजे तब्बल 72 तासानंतर श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईहून मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर श्रीदेवी यांच्या अंतिम दर्शनासाठी दिग्गज नेत्यांसह, संपूर्ण बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील दिग्गजांनी हजेरी लावली. 

Web Title: Marathi News National News Sridevi Funaral Ceremony