सर्वोच्च न्यायालय प्रशासन नीट काम करत नाही : न्यायाधीश जे. चेलमेश्वर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून न्यायालयाचे कामकाम सुरळीत चालवले जात असते. तसेच सर्वोच्च न्यायालयतील न्यायाधीशांकडून उघडपणे माध्यमांसमोर मत प्रदर्शन केले जात नसे. मात्र, आज सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी खुद्द सर्वोच्च न्यायालय प्रशासनावरच टीका केली आहे. ''सर्वोच्च न्यायालय प्रशासन नीट काम करत नाही'', अशी टीका सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यानंतर जे. चेलमेश्वर यांची ज्येष्ठता येते. त्यांनी आज न्यायालय प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यासाठी इतिहासात प्रथमच पत्रकार परिषद घेऊन न्यायालय प्रशासनाच्या कामकामावर टीकास्त्र सोडण्यात आले. यावेळी न्यायाधीश रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ उपस्थित होते.

चेलमेश्वर यांनी सांगितले, की ''मागील दोन महिन्यांत न्यायालयाचे कामकाज व्यवस्थित होत नाही. न्यायालयातील कामकाजातील काही गोष्टी विशिष्ट अशा कालावधीत होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे घडत नाही. सर्वोच्च न्यायालय प्रशासन नीट काम करत नाही. याबाबतचा विषय मुख्य न्यायमूर्तींपर्यंत मांडण्यात आला आहे. पण तरी काहीही उपयोग झाला नाही. न्यायव्यवस्था टिकली नाहीतर लोकशाही टिकणार नाही'', असे ते म्हणाले.

दरम्यान, या सर्व न्यायाधीशांनी कोणत्या विषयासंबंधी पत्रकार परिषद घेतली हे समजू शकले नसले तरीदेखील याबाबतचे पत्रक सर्व प्रसिद्धी माध्यमांना दिले जाणार आहे. त्यामुळे याबाबतचे स्पष्टीकरण लवकरच मिळणार आहे.

Web Title: marathi news national news Supreme court administration not working rightly says justice J chelmeshwar