अयोध्याप्रकरणाची पुढील सुनावणी 14 मार्चला

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

आयोध्यातील राम जन्मभूमीप्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून, यापुढील सुनावणी 14 मार्चला केली जाणार आहे. हे प्रकरण जमिनीच्या वादानुसार पाहिले जाणार आहे, असल्याचे न्यायालयाने आज (गुरुवार) स्पष्ट केले. 

नवी दिल्ली : आयोध्यातील राम जन्मभूमीप्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली असून, यापुढील सुनावणी 14 मार्चला केली जाणार आहे. हे प्रकरण जमिनीच्या वादानुसार पाहिले जाणार आहे, असल्याचे न्यायालयाने आज (गुरुवार) स्पष्ट केले. 

ayodhya

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने याप्रकरणाचे सर्व पुरावे त्यांच्याकडे ठेवले आहेत. अयोध्यातील राम मंदिर-बाबरी मशीद वादासंबंधीच्या प्रकरणाची सुनावणी आज (गुरुवार)पासून सर्वोच्च न्यायालयात सुरू केली जाणार होती. मात्र, याप्रकरणाची सुनावणी आता पुढील महिन्यात केली जाणार आहे.  

यावेळी न्यायालयाने सर्व पक्षकारांना दोन आठवड्यांमध्ये आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी यापुढे कोणताही पक्षकार यामध्ये येऊ शकत नाही.   

दरम्यान, 5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकाराच्या वतीने म्हणणे मांडताना वकील कपिल सिब्बल यांनी म्हटले होते, की या प्रकरणाच्या सुनावणीसाठी एवढी घाई का केली जात आहे? जुलै 2019नंतर या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे.

 

Web Title: Marathi News National News Supreme Court Ayodhya Issue 14 March