खटल्यांच्या वाटपासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून रोस्टर सिस्टिम

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 फेब्रुवारी 2018

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून रोस्टर सिस्टिम लागू करण्याची तयारी सुरु आहे. या रोस्टर सिस्टिमनुसार खटल्यांची सुनावणी केली जाणार आहे.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून रोस्टर सिस्टिम लागू करण्याची तयारी सुरु आहे. या रोस्टर सिस्टिमनुसार खटल्यांची सुनावणी केली जाणार आहे. याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केले. 

supreme court Judges

सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर, रंजन गोगोई, एम. बी. लोकूर आणि न्यायाधीश कुरियन जोसेफ या चार न्यायाधीशांनी 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत खटल्यांच्या वाटपाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच या सर्वांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली होती. 

त्यानंतर सरन्यायाधीश मिश्रा यांनी या सर्व खटल्यांची सुनावणी करण्यासाठी रोस्टर सिस्टिम लागू करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. 

दरम्यान, हे नवे रोस्टर 13 पानांचे असून, या नव्या सिस्टिमनुसार 5 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत ही रोस्टर सिस्टिम लागू करण्यात येणार आहे. 

 

Web Title: Marathi News national News Supreme Court Roster System CJI