दूरसंपर्क कंपन्यांनी थकवले अडीच हजार कोटी 

telecom
telecom

नवी दिल्ली : ताळेबंदामध्ये फेरफार करून कमी महसूल दाखवल्याप्रकारणी कॅगने पाच कंपन्यांना दोषी ठरवले आहे. कॅगच्या अहवालानुसार दूरसंपर्क विभागाने टाटा टेलिसर्व्हिसेस, टेलेनॉर, व्हिडिओकॉन, क्वाड्रॅंट आणि रिलायन्स जिओ या पाच कंपन्यांनी 2 हजार 578 कोटींची थकवले असून, त्यांना लवकरच वसुलीची नोटीस बजावण्यात येणार आहे. 

कॅगचा अहवाल 19 डिसेंबर रोजी संसदेत सादर करण्यात आला. यामध्ये टाटा टेलिसर्व्हिसेस, टेलेनॉर, व्हिडिओकॉन, क्वाड्रॅंट आणि रिलायन्स जिओ या पाच कंपन्यांनी ताळेबंदामध्ये 14 हजार 800 कोटींचा महसूल कमी दाखवला आहे. यामुळे सरकारचे 2 हजार 578 कोटींचे नुकसान झाल्याचा ठपका कंपन्यांवर ठेवण्यात आला आहे. या कंपन्यांनी सरकारकडे स्पेक्‍ट्रम शुल्क 1 हजार 15 कोटी कमी भरले. त्याचबरोबर स्पेक्‍ट्रम वापराचे शुल्क 1 हजार 52 कोटी आणि विलंबाबाबतचे व्याज 511 कोटी कमी भरल्याचे कॅगच्या तपासणीमध्ये आढळले आहे.

सरकारने टाटा टेलिसर्व्हिसेसकडून 1 हजार 893.6 कोटी कमी वसूल केले. टेलिनॉरकडून 603.75 कोटी, व्हिडिओकॉन 48.08 कोटी, क्‍वाड्रंट 26.62 कोटी, जिओ 6.78 कोटी कमी वसूल केले. कॅगच्या परीक्षणात ही बाब उघड झाल्यानंतर दूरसंपर्क खात्याने कारवाईची तयारी केली आहे. कंपन्यांना लवकरच वसुलीची नोटीस बजावण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com