करंज पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई - भारतीय नौदलात आज स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ''करंज'' दाखल झाली. मुंबईतल्या माझगाव डॉक इथे स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचे आज (बुधवार) जलावरण झाले. यावेळी नौदलाचे प्रमुख सुनील लांबा उपस्थित होते.

मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली ही पाणबुडी प्रत्येक प्रकारातल्या युद्धास उपयुक्त ठरेल, असे तिचे डिझाईन आहे. तसेच या पाणबुडीतून शत्रूवर अचूक निशाणा साधणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे कलवरी, खांदेरी नंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलात दाखल झाली आहे आहे.

करंज पाणबुडी 

  • लांबी - 67.5 मिटर  
  • उंची - 12.3 मिटर   
  • वजन - 1565 टन 
  • 'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा मारा करू शकते.
  • युद्धाच्या वेळी 'करंज' अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. 
  • या पाणबुडीचा वापर हरतऱ्हेच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामात केला जाऊ शकतो.

मेक इन इंडियाअंतर्गत 6 पाणबुड्या बनवण्यात येणार आहेत.

Web Title: marathi news national news Third Scorpene-class submarine INS Karanj