विविध सेवा-सुविधांसाठी 'आधार' आवश्यकच : यूआयडीएआय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 मार्च 2018

''बँक खाते, तात्काळ पासपोर्ट सेवा, म्युच्युअल फंड आणि टेलिकॉम सेवा यांसारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी यापुढे आधारक्रमांक गरजेचाच आहे''.

- अजय भूषण पांडे, सीईओ, यूआयडीएआय

नवी दिल्ली : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड आवश्यकच आहे. ''बँक खाते, तात्काळ पासपोर्ट सेवा, म्युच्युअल फंड आणि टेलिकॉम सेवा यांसारख्या सेवांचा लाभ घेण्यासाठी यापुढे आधारक्रमांक गरजेचाच आहे'', असे स्पष्टीकरण 'युनिक आयडेंटिफिकेश ऑथोरिटी ऑफ इंडिया'चे (यूआयडीएआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी दिले. 

AADHAR

विविध सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक करण्यासाठी 31 मार्चपर्यंत डेडलाइन दिली होती. त्यानंतर पुढील सुनावणी होईपर्यंत आधार लिकिंगची मुदत अनिश्चित कालावधीसाठी वाढविण्यात आली. त्यानंतर आता आधार लिंक करणे बंधनकारक केले नसले तरीदेखील नवीन बँक खाते, तात्काळ पासपोर्ट, म्युच्युअल फंड आणि विविध टेलिकॉम सेवांचा लाभ घेण्यासाठी यापुढेही आधारक्रमांक देणे आवश्यकच असेल, असे 'यूआयडीएआय'ने स्पष्ट केले. त्यामुळे आधार लिंकिंगची डेडलाइन वाढविण्यात आली असली तरी या सर्व सेवा-सुविधांचा लाभ घेण्यासाठी संबंधितांना आधारक्रमांक द्यावाच लागणार आहे. 

Web Title: Marathi News National News UIDAI Aadhar Number must be needed says CEO Ajay Bhushan Pandey