कासगंज हिंसाचारातील मुख्य आरोपीला अटक

वृत्तसंस्था
बुधवार, 31 जानेवारी 2018

''एफआयआर दाखल झाली असून, संबंधितांचा जबाब घेतला आहे. या जबाबानंतर आरोपी सलीम यास पोलिसांनी अटक केली आहे. सलीम याने घरातील बाल्कनीतून चंदन गुप्ता यांची गोळी झाडून हत्या केली''

- आनंद कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक, उत्तर प्रदेश

लखनौ : उत्तर प्रदेशातील कासगंज हिंसाचारातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. सलीम असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सलीम यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली.   

kasganj violence

सलीमने चंदन यांच्यावर गोळी झाडली होती. या गोळीबारात चंदनचा मृत्यू झाला होता. या आरोपावरून पोलिसांनी आरोपी सलीम यास ताब्यात घेतले. याबाबत उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आनंद कुमार यांनी सांगितले, की एफआयआर दाखल झाली असून, संबंधितांचा जबाब घेतला आहे. त्या जबाबानंतर आरोपी सलीम यास पोलिसांनी अटक केली आहे. सलीम याने घरातील बाल्कनीतून चंदन गुप्ता यांची गोळी झाडून हत्या केली.  

UP kasganj violence

प्रजासत्ताक दिनी विश्व हिंदू परिषद आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दोन वेगवेगळी तिरंगा रॅली काढली होती. या रॅलीदरम्यान मुस्लिम बहुल भागात भडकलेल्या हिंसाचारात चंदन यांचा मृत्यू झाला होता.  

Web Title: Marathi News National News Uttar Pradesh Kasganj violence one accused