20 वर्षे शिक्षा भोगूनही 'त्याला' पुन्हा जायचेय तुरुंगात!

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

''जेव्हा मी येथे परत आलो, तेव्हा माझे खेडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडून गेले. आता इथे कोणी राहत नाही. आता माझ्याजवळ काहीच नाही, त्यामुळे आता मला खूप भीती वाटते.''

- पुष्कर भट्ट

बस्तडी : आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला न्यायालयाकडून शिक्षा सुनावली जाते. तुरुंगात शिक्षा भोगून अनेक गुन्हेगारांना घरी परत जाण्याची इच्छा होत असते. मात्र, 20 वर्षांपेक्षा अधिक वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर उत्तराखंडातील गुन्हेगाराने पुन्हा तुरुंगात जाण्याची इच्छा व्यक्त केली.

jail

पुष्कर भट्ट असे त्या कैद्याचे नाव आहे. पुष्करने 20 वर्षांपूर्वी पत्नी आणि मुलीची हत्या केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. उत्तराखंडातील सितरगंज तुरुंगात शिक्षा भोगून नुकतीच त्याची सुटका झाली. मात्र, तब्बल 20 वर्षानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीविषयी अजाण असल्याने त्याला आता जगात मुक्तपणे वावरायचे कसे, हा प्रश्न पडला आहे. 

''जेव्हा मी येथे परत आलो, तेव्हा माझे खेडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडून गेले. आता इथे कोणी राहत नाही. आता माझ्याजवळ काहीच नाही, त्यामुळे आता मला खूप भीती वाटते,'' असे पुष्कर म्हणाला. 

Web Title: Marathi News National News Uttarakhand News Prison Pushkar Bhatt