'व्हॅलेंटाइन डे'पासून दूर रहा ; लखनऊ विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

''बुधवारी 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी कोणीही विद्यापीठ परिसरात येऊ नये. तरीदेखील विद्यार्थी विद्यापीठ परिसरात दिसले तर त्यांच्यावर नियमभंग केल्याची कारवाई केली जाणार आहे''. 

लखनऊ : 'व्हॅलेंटाइन डे' उद्या (बुधवार) साजरा करण्याची तयारी सध्या तरुणाई करत आहे. त्यानंतर असे असताना लखनऊ विद्यापीठाने विद्यार्थ्यांना व्हॅलेंटाइन डेपासून दूर राहण्याचा अजब सल्ला दिला आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने परिपत्रकच काढले आहे. यामध्ये बुधवारी विद्यापीठाच्या आवारात येऊ नये, असे सांगितले आहे.

valentines day

विविध महाविद्यालये, विद्यापीठ आणि इतरत्र तरुणाईकडून व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी तयारी केली जात आहे. मात्र, व्हॅलेंटाइन डेबाबत लखनऊ विद्यापीठ प्रशासनाने अजब सल्लाच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दिला आहे. यासाठी विद्यापीठाने पत्रकच काढले आहे. या परिपत्रकामध्ये सांगण्यात आले, की ''बुधवारी 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी कोणीही विद्यापीठ परिसरात येऊ नये. तरीदेखील विद्यार्थी विद्यापीठ परिसरात दिसले तर त्यांच्यावर नियमभंग केल्याची कारवाई केली जाणार आहे''. 

Valentines day

''14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने तरुणाईची मोठी गर्दी होते, असे गेल्या काही वर्षांपासून निदर्शनास येत आहे. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीला वाव मिळत आहे. विद्यापीठातील सर्व तरुण-तरूणींना सांगण्यात येते, की 14 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त विद्यापीठ पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे'', असे विद्यापीठाचे प्रॉक्टर विनोद सिंग यांनी जारी केलेल्या प्रसिद्धपत्रकात सांगितले आहे. 

Web Title: Marathi News National news Valentine Day Lacknow University