तरुणांना प्रेमाचा अधिकार : प्रवीण तोगडिया

वृत्तसंस्था
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

''प्रेम नाही केले तर विवाह होणार नाही आणि जर विवाह झाला नाही तर सृष्टी चालणार कशी? तरुण आणि तरूणींना प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, मला असे वाटते आपल्या मुलीला प्रेम करण्याचा हक्क आहे आणि आपल्या बहिणीलाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. असे म्हणत यंदा 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''.  

- प्रवीण तोगडिया, विश्व हिंदू परिषद

चंदीगड : गेल्या काही वर्षांपासून 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोहिम राबवत निषेध करत आहेत. मात्र, या 'व्हॅलेंटाइन डे'च्या निमित्ताने विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी याबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले, ''तरुण पुरुष आणि महिलांना प्रेम करण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''. 

Valentines day

चंदीगड येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ''प्रेम नाही केले तर विवाह होणार नाही आणि जर विवाह झाला नाही तर सृष्टी चालणार कशी? तरुण आणि तरूणींना प्रेम करण्याचा पूर्ण अधिकार आहे. तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, मला असे वाटते आपल्या मुलीला प्रेम करण्याचा हक्क आहे आणि आपल्या बहिणीलाही प्रेम करण्याचा अधिकार आहे. असे म्हणत यंदा 'व्हॅलेंटाइन डे'ला कोणताही निषेध किंवा हिंसाचार होणार नाही''.  

valentines day

गेल्या अनेक वर्षांपासून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून 'व्हॅलेंटाइन डे'वर भारतात बंदी आणली जावी, यासाठी मागणी केली जात आहे. 'व्हॅलेंटाइन डे'ला त्यांच्याकडून हिंदूविरोधी आणि भारतविरोधी म्हणून संबोधले जात आहे.  

दरम्यान, विहिपच्या या निर्णयामुळे 'व्हॅलेंटाइन डे'साठी तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना याचा फायदा होणार आहे.  
 

Web Title: Marathi News National News Valentine Day Youth Has Right Pravin Togdia