शशिकला यांचा पॅरोलसाठी अर्ज

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 मार्च 2018

नटराजन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रविवारी चेन्नईतील ग्लोबल हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. तसेच त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्यांचे वयाच्या 76 व्या वर्षी काल (सोमवार) रात्री निधन झाले.

नवी दिल्ली : तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व्ही. के. शशिकला यांचे पती नटराजन मरुथप्पा यांचे काल (सोमवार) निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी शशिकला यांनी 15 दिवसांच्या पॅरोलसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या पॅरोल अर्जावर न्यायालयाकडून निर्णय येणे अपेक्षित आहे.

Shashikala

सुमारे 66 कोटींच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2017 मध्ये शशिकला यांना दोषी ठरवले. न्यायालयाने त्यांना 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शशिकला या बंगळुरुतील पराप्पाना अग्रहारा मध्यवर्ती कारावगृहात शिक्षा भोगत आहेत. यापूर्वी शशिकला यांना 7 ऑक्टोबर, 2017 रोजी पॅरोल मंजूर करण्यात आला होता. तेव्हा नटराजन यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर आता नटराजन यांच्या निधनाने त्यांच्या अंत्यविधीसाठी पॅरोल मिळावा, यासाठी अर्ज केला आहे. 

नटराजन यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रविवारी चेन्नईतील ग्लोबल हेल्थ सिटी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. तसेच त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने अखेर त्यांचे वयाच्या 76 व्या वर्षी काल (सोमवार) रात्री निधन झाले.

Web Title: Marathi News National News VK Sasikala seeks 15 day parole to attend husband funeral