वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गडकरींचे कडक उपाय

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी विषारी वायूची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे यापासून बचावासाठी दिल्ली सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. तसेच प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने वाहनांसाठी सम-विषम योजना आणली होती. या योजनेला हरित लवादाने सशर्त परवानगी दिली होती. 

नवी दिल्ली : ''भारतात प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. तसेच दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती प्रत्येकाला माहिती आहे. त्यामुळे यंदा 1 एप्रिलपासून बीएस 4 प्रणाली राज्यात अनिवार्य केली जाणार आहे'', अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच त्यांनी ऑटोमोबाईल उद्योगांना प्रदूषण नियंत्रणासाठी मदत करण्याचे आवाहनही केले.

राजधानी दिल्लीत प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी विषारी वायूची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत होती. त्यामुळे यापासून बचावासाठी दिल्ली सरकारकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. तसेच प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने वाहनांसाठी सम-विषम योजना आणली होती. या योजनेला हरित लवादाने सशर्त परवानगी दिली होती. 

दिल्लीतील या सम-विषम योजनेत महिलांना आणि दुचाकींना सूट मिळावी, असे दिल्ली सरकारचे म्हणणे होते. मात्र, हरित लवादाने अशा कोणालाही यातून सूट देण्यात येणार नसल्याचे सांगितले होते. 

प्रदूषणाची समस्या अजूनही तशीच असल्याने यावर उपाययोजना म्हणून गडकरींनी 1 एप्रिलपासून दिल्लीत बीएस 4 प्रणाली अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ''ऑटोमोबाईल उद्योगांना त्यादृष्टीने काम करून प्रदूषण नियंत्रणाबाबत मदत करावी, असे आवाहन केले आहे. तसेच भारतात वैकल्पिक इंधन आणि जैव इंधनावर भर दिला जात आहे'', असेही ते म्हणाले. 

Web Title: Marathi news National News We decided to make BS VI mandatory from 1st April says union minister nitin gadkari