देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 मार्च 2018

यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील काही भागात 2018 या वर्षातील सहा महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढून हवामानात विकास होण्याची शक्यताही अमेरिकास्थित खासगी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.  

नवी दिल्ली : यंदा देशात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडील काही भागात 2018 या वर्षातील सहा महिन्यात एल निनोचा प्रभाव वाढून हवामानात विकास होण्याची शक्यताही अमेरिकास्थित खासगी हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.  

RAIN INDIA

अर्जेंटिनसारख्या दुष्काळग्रस्त भागातील देशाच्या पूर्वेकडील भागात मान्सूनची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, सोयाबीन पिकाचे पुनरुज्जीवन करण्यास फार उशीर झालेला आहे, असे 'रेडियंट सोल्यूशन्स'चे ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ एम. ए. अर्थसाट यांनी सांगितले. तसेच 'ला निना'चा प्रभाव कमी प्रमाणात असून, आम्ही तटस्थ हवामानाप्रमाणे जात आहोत. तर एल निनोप्रमाणे सहा महिन्यात भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग आणि कापूस या पिकांवर याचा परिणाम होऊ शकतो. 

दरम्यान, मागील वर्षी भारतात वार्षिक हवामान सरासरीपेक्षा कमी होते. उत्तरेकडील काही राज्यात गरजेचेपेक्षा कमी प्रमाणात पाऊस पडला होता. 
 

Web Title: Marathi News National News Whether News Indias monsoon expects to be down says forecaster