महिलांवर बलात्कारांचे खटले चालू शकत नाही : सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्कार यांसारखे खटले महिलांवर चालू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

नवी दिल्ली : महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्यानंतर आता लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्कार यांसारखे खटले महिलांवर चालू शकत नाही, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला.

rape

'जेंडर न्यूट्रल' करण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. लैंगिक शोषण, विनयभंग आणि बलात्कार यांसारख्या प्रकरणात स्त्री किंवा पुरुष कोणाकडूनही गुन्हा होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर महिलांनी पुरुषांवर अत्याचार केल्यास संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी करत याचिका दाखल करण्यात आली होती. 

त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत सांगितले, की जर पुरुषांचे लैंगिक शोषण झाले, तर त्याबाबत गुन्हा नोंदविण्यासाठी भारतीय दंडविधान कलममध्ये (आयपीसी) वेगळी तरतूद आहे. त्यामुळे महिलांवर बलात्काराचे खटले चालू शकत नाही.

Web Title: Marathi News National News Women Rape Cases Supreme Court