तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे मुस्लिम महिला होणार मुक्त : पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

तिहेरी तलाक सारख्या प्रचलित प्रथेमुळे मुस्लिम समाजातील महिलांना अनेक वर्षांपासून अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना स्वत: या अनिष्ट प्रथेपासून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला आहे. 

नवी दिल्ली : तिहेरी तलाकविरोधी विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात आले. त्यानंतर या विधेयकाला लोकसभेत मान्यता देण्यात आली. यावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले. ते म्हणाले, ''गेल्या अनेक वर्षांपासून पीडा सहन केल्यानंतर मुस्लिम समाजातील महिलांना अखेर या अघोरी प्रथेपासून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला आहे'', असे त्यांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून सांगितले.

ते म्हणाले, ''नवीन वर्ष 2018 पासून नागरिकांनी देशाच्या हिताच्या दृष्टीने काम केले पाहिजे. आमच्या सरकारकडून काळापैसा, भ्रष्टाचार, बेहिशेबी संपत्ती आणि दहशतवादाशी लढण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील. 'सब का साथ, सब का विकास'चे आवाहन त्यांनी केले आहे. आता नव्या वर्षाचे मंत्र 'सुधार, प्रदर्शन आणि परिवर्तन' असेल. 

गेल्या आठवड्यात 'मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण' विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. याबाबत मोदी म्हणाले, तिहेरी तलाक सारख्या प्रचलित प्रथेमुळे मुस्लिम समाजातील महिलांना अनेक वर्षांपासून अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता त्यांना स्वत: या अनिष्ट प्रथेपासून मुक्त होण्याचा मार्ग मिळाला आहे. 

Web Title: marathi news national PM Narendra Modi on Man ki Baat