भाजप सरकारने मतांचे राजकारण संपवले : नक्वी

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 जानेवारी 2018

''गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रात सुरु असलेले देशातील मतांचे राजकारण भाजप सरकारने संपुष्टात आणले. आमचे धोरण सबलीकरण करणे आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक घटकांसाठी काम केले जात आहे"

नवी दिल्ली : ''गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रात सुरु असलेले मतांचे राजकारण भाजप सरकारने संपुष्टात आणले आहे, असे केंद्रीय अल्पसंख्यांक कामकाजमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी गुरुवारी सांगितले. 

नऊ राज्यांतील अल्पसंख्यांक कल्याणमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, बिहार आणि दिल्ली या राज्यांतील मंत्र्यांनी उपस्थिती लावली. नक्वी म्हणाले, ''गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रात सुरु असलेले देशातील मतांचे राजकारण भाजप सरकारने संपुष्टात आणले. आमचे धोरण सबलीकरण करणे आहे. नरेंद्र मोदी सरकारकडून दिलेले आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्वसमावेशक घटकांसाठी काम केले जात आहे", असेही ते म्हणाले. 

''सरकारी नोकऱ्यांमध्ये अल्पसंख्यांकांचा सहभाग वाढला आहे. यापूर्वी 2014 मध्ये 5 टक्के इतका सहभाग होता. आता यामध्ये वाढ होऊन 10 टक्क्यांवर गेला आहे. तसेच यावर्षी नागरी सेवेत सुमारे 125 अल्पसंख्यांक तरुणांना सेवेत घेण्यात आले. यापैकी 52 तरूण हे मुस्लिम समाजाचे आहेत. सध्याच्या धोरणानुसार अल्पसंख्यांक देशातील विकासाच्या दृष्टीने समान भाग बनत आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Marathi news National Politics