'आप' अपात्रताप्रकरण ; सोमवारपर्यंत पोटनिवडणुकीची घोषणा करू नका : दिल्ली उच्च न्यायालय

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जानेवारी 2018

आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर याविरोधात 'आप'कडून याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील पुढील सुनावणी (सोमवार) 29 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत पोटनिवडणूक जाहीर न करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या 20 आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर याविरोधात 'आप'कडून याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील पुढील सुनावणी (सोमवार) 29 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत पोटनिवडणूक जाहीर न करण्याचे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

लाभाचे पद घेतल्याच्या आरोपातून 'आप'च्या 20 आमदारांचे विधानसभेचे सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, याबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे शिफारस केली होती. राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाच्या या शिफारसीला मंजूरी दिली. या निर्णयाविरोधात आपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. मात्र, आपकडून सोमवारी ही याचिका मागे घेण्यात आली होती. त्यानंतर आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सत्ताधारी आम आदमी पक्षाकडून या निर्णयाविरोधात नवी याचिका दाखल केली जाणार आहे, असे सांगितले होते.

दरम्यान, आता या नव्या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी (ता.29) रोजी केली जाणार असल्याने तोपर्यंत या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका जाहीर करू नये, असे न्यायालयाने सांगितले. 

Web Title: Marathi news national politics AAP MLAs disqualification plea Delhi HC orders EC to make no bypoll announcement until Monday