कार्ती चिदंबरम यांना 'ईडी'कडून समन्स

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले, असा आरोप आहे. 

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. त्यामुळे आता कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर 11 जानेवारीपर्यंत त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे. 'प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग' कायद्यांतर्गत कार्ती चिदंबरम आणि अन्य काही जणांविरोधात मागील वर्षी मे महिन्यात खटला दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने आरोपी म्हणून कार्ती चिदंबरम, आयएनएक्स मीडियासह त्यांच्या संचालक तसेच पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्यावर कारवाई सुरु आहे.

पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या कंपनीला नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त ४.६२ कोटींची विदेशी गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी ३०५ कोटी रुपये उभे केले, असा आरोप आहे. 

दरम्यान, कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्तवसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला होता.

Web Title: marathi news national politics ED summons Karti Chidambaram on Jan 11 in money laundering case