पलानीस्वामी यांचे सरकार तीन महिन्यात पडेल : दिनाकरन

वृत्तसंस्था
रविवार, 24 डिसेंबर 2017

तमिळनाडू : इडाप्पडी के. पलानीस्वामी यांचे सरकार तीन महिन्यात पडेल, असा विश्वास अण्णाद्रमुकचे बंडखोर नेते टीटीव्ही दिनाकरन यांनी आज व्यक्त केला. ''आम्ही अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते आहोत. आरके नगरच्या मतदारांनी अम्मांना (दिवंगत मुख्यमंत्री जयललिता) निवडून दिले होते. मात्र, आता पलानीस्वामी यांचे सरकार येत्या तीन महिन्यात पडेल'', असे दिनाकरन म्हणाले.

मदूराई विमातळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, या निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह हे निवडणूक जिंकण्यास कारणीभूत नाहीतर उमेदवार कोण आहेत हे महत्वाचे आहे. दिनाकरन यांनी ई. पलानीस्वामी आणि ओ. पनीरसेल्वम यांच्या नावापासून सुरु होणाऱ्या पक्षाच्या नावाची तुलना तमिळ चित्रपटाशी केली. जर एम. एन. नंबियार किंवा वीरप्पन हे निवडणूक लढवतील तर त्यांना कोण मतदान करणार, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले, सध्या परिस्थिती तशीच आहे.

तमिळनाडूच्या आरके नगर विधानसभा मतदारसंघातून तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता या दोनदा निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर ही जागा आजपर्यंत रिक्त होती. या जागेसाठी नुकतीच पोटनिवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीसाठी 21 डिसेंबरला मतदान घेण्यात आले होते. 145 अर्जदारांनी अर्ज दाखल केले होते. पण निवडणूक आयोगाने 72 उमेदवारांचेच अर्ज स्विकारले होते. 

आरके नगरची पोटनिवडणूक सत्ताधारी एआयएडीएमके, प्रतिस्पर्धी नेते टीटीवी दिनाकरन आणि मुख्य विरोधक डीएमके या प्रमुख दावेदारांकरिता महत्वाचे मानली जात आहे. निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने विजय मिळविल्यास पक्ष आणि सरकारमध्ये मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाची पुनर्रचना केली जाईल.

Web Title: Marathi news national politics Edappadi K Palaniswami government would fall in three months say Dhinakaran